१९२२ रोजी एक ऐतिहासिक घटना घडली होती. बऱ्याच
लोकांना याबद्दल माहित नाही. लिओनार्ड थोमसन नावाचा १४ वर्षाचा तरुण मुलगा
मधुमेहाच्या एकदम गंभीर स्थितीत, टोरेंटो जनरल हॉस्पीटल मघ्ये आपल्या मरणाची वाट
बघत होता. त्या काळी लहान वयातील मधुमेह (Type 1 diabetes mellitus) झाला सांगणे म्हणजे मृत्युवार्ता
सांगण्यासारखं असायचं. तर या थोमसन ची अवस्था पण अशीच होती. त्याच दरम्यान
फ्रेड्रिक बेन्तिंग नावाच्या सर्जन व त्याचा सहकारी चार्ल्स बेस्ट यांचा शोध सुरु
होता त्यांनी कुत्र्याच्या स्वादुपिंडाच्या टोकातील स्त्राव काढला होता. त्यांनी
असे निरक्षण केलं होता कि हा स्त्राव दुसऱ्या कुत्र्याला दिल्यास त्याचे रक्तातील
साखरेचे प्रमाण कमी होत असे. असेही मरणशैय्ये वर थोमसन ला हा स्त्राव देण्याचे
ठरले आणि ते ११ जानेवारी १९२२ साली दिले. पुढच्या २४ तासात थोमसन ची साखर एकदम
नॉर्मल झाली. त्याला थोडी अॅलर्जी आली खरी पण त्याची तब्येत एकदम सुधारली. या
स्त्रावाला त्यांनी ऐस्लेतीन (Iseletin) असे नाव दिलं. त्याचा अर्थ बेटांच्या समूहासारख्या दिसणाऱ्या पेशींचा
स्त्राव. हा स्त्राव तपकिरी रंगाचा होता. त्यानंतर जे. बी. कोलीन नावाच्या
रसायनशास्त्रज्ञ याच्या मदतीने त्या स्त्रावाचे शुद्धीकरण करण्यात यश आले व एक पाण्यासारखे
दिसणारे रसायन मिळाले त्यालाच इन्सुलिन हे नाव देण्यात आले. थोमसनलाच १२ दिवसांनी
शुद्ध इन्सुलिन चा दुसरा डोस देण्यात आला यावेळी त्याला कुठलीही अॅलर्जी झाली
नाही. लिओनार्ड थोमसन हा जगताला पहिला इन्सुलिन घेणारा मनुष्य ठरला. दुर्दैवाने
वयाच्या २६ व्या वर्षी न्युमोनियाने त्याचा जीव गेला. असो. आणखी ६ लोकांना हे नवीन
इन्सुलिन देण्यात आलं आणि त्याचे चांगले परिणाम बघायला मिळाले. काही महिन्यातच
इली-लिली नावाच्या औषध निर्माण कंपनी ने मोठ्या प्रमाणात प्राण्यांच्या
स्वादुपिंडातून इन्सुलिन निर्मिती सुरु केली. बहुतांश मधुमेहींना जीवनदान मिळू
लागले. अशी वर्णन आहेत कि त्या काळी Type
1 diabetes च्या पेशंटचा एक वार्ड असायचा, तिथ इन्सुलिन चा शोध लागायच्या आधी लहान मुले
बेशुद्ध अवस्थेत पडलेली असायची. त्याकाळी या मुलांचे जीवनमान हे फार फार तर १७-१८
वर्षे असायचं. भयंकर अस्वस्थता असायची. पालक भेदरलेले असायचे. जेंव्हा इन्सुलिन
आले तेंव्हा सुरुवातीला त्यांचा प्रयोग इथं झाला. असं म्हंटलं जात कि त्या
वार्डातील शेवटच्या मुलाला इन्सुलिन चा डोस जाईपर्यंत पहिला मुलगा उठून बसायचा. हे
किस्से वैद्यकीय क्षेत्रात वाऱ्या सारखे पसरले. हजारो तरुण पोरांचे प्राण वाचायला
लागले. १९२३ साली या तिघा संशोधकांना वैद्यकीय शास्त्रातील
नोबेल पुरस्कार देण्यात आला. पुढे संगर (sangar) नावाच्या रसायनशास्त्रज्ञाने इन्सुलिन च्या रासायनिक
रचनेची उकल केली. नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या इन्सुलिन ची निर्मिती होऊ लागली. संगर (sangar) ला सुद्धा नोबेल पारितोषक मिळाले. १९८२ साली पहिले जेनेटिक इंजिनिअरिंग करून
हुमन इन्सुलिन (मानवाच्या शरीरातील इन्सुलिन सारखे) मार्केट मध्ये मिळायला लागले. इन्सुलिन
चा शोध हा वैद्यकीय शास्त्रातील अत्यंत महत्वाच्या शोधापैकी एक मानले जाते. आज
याचा शोध लागून १०० हून अधिक वर्षे झाली आहेत
अजूनही मधुमेहाच्या उपचारासाठी इन्सुलिन आपले उच्च स्थान टिकवून आहे.
No comments:
Post a Comment